पुणे शहरात कोरोनाबाधित रूग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रशासनाने कोरोना चाचण्यांचे (corona test) प्रमाण वाढवण्यावर भर दिला आहे. शहरातील दर दहा लाख लोकांमागे सुमारे 30 हजार कोरोना चाचण्या होत आहेत.राज्याच्या तुलनेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांमध्ये पुणे शहरात सर्वांत जास्त कोरोना चाचण्या होत आहेत. या पाठोपाठ मुंबई शहराचा नंबर आहे.पुणे शहरातील कोरोना बधितांचा आकडा 34582 वर पोहचला आहे. पुण्यात काल एका रात्रीत 183 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 979 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 2 लाख 33 हजार 254 नागरिकांचे ट्रेसिंग करण्यात आले आहे. यामध्ये 73 हजार 383 नागरिक ‘हाय रिस्क’ गटातील आहेत. तर, 1 लाख 59 हजार 871 नागरिक ‘लो रिस्क’ गटातील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here