मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांच्याच कोरोनाच्या चाचणी घेण्यात आल्या आहेत. बच्चन पिता-पुत्रांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली जात होती. मात्र, बच्चन कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खासदार जया बच्चन, अभिनेत्र ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या बच्चन यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

आज दुपारपर्यंत बच्चन कुटुंबातील इतर लोकांच्या कोरोना चाचणीचे अहवाल येणार आहेत. मात्र, माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बच्चन कुटुंबातील जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अधिकृतरित्या याबाबत दुपारीच माहिती मिळणार आहे. अमिताभ बच्चन यांचे इतर नातेवाईकही त्यांच्यासोबत राहत असल्याचंही बोललं जात आहे. त्यांच्याही कोरोना चाचणी घेण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त त्यांच्या घरातील सर्व कर्मचाऱ्यांचे देखील स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. त्यांचेही अहवाल लवकरच येणार आहेत.

अमिताभ बच्चन याचं घर मुंबई महानगरपालिकेच्या के वेस्ट वार्डात येते. या वार्डात आतापर्यंत एकूण 5 हजार 300 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी अनेकजण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या येथे 1 हजार 445 सक्रीय रुग्ण आहेत. या वार्डात आतापर्यंत 241 जणांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here