(टीम सिंहगड मित्र)
पुण्यामध्ये कोरोना संक्रमण झालेले रुग्ण प्रचंड मोठ्या संख्येने आढळून येत असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा लोक डाऊन ची घोषणा केली.
13 जुलै ते 23 जुलै पर्यंत हा लॉक डाऊन असणार आहे परंतु लॉकडाउनच्या धास्तीने पुणेकरांनी मात्र घरगुती, किराणा मालाचे सामान व वाईन शॉप समोर प्रचंड गर्दी केल्याने सोशल डिस्टंसिंग चे तीन तेरा वाजविले आहेत. नागरिकांच्या मनामध्ये लोक डाऊन असेच पुढे वाढले तर काय करायचं? ही भीती असल्यामुळेच खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसत आहे. याचाच काही व्यापारी लोकांनी गैरफायदा घेत वस्तूंच्या किमती वाढविल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने मात्र व्यापाऱ्यांना सूचना करून देखील जर व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लुटमार होत असेल तर त्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे देखील आदेश प्रशासनाने दिले आहेत.
लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर नागरिकांनी खरेदीसाठी अचानकपणे झुंबड उडविली असल्यामुळे भाज्या व किराणा मालाचा काही ठिकाणी तुटवडा भासल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here