आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो : भाजप आमदार गोपीचंद पडळकर ट्रोल

0
378

सोशल मीडियात भाजप आमदार गोपीचंद पडळकर ट्रोल होत असून गोपिचंद पडळकर यांनी थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणाऱ्या पोस्टमध्ये आगरकरांऐवजी चक्क लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा फोटो वापरल्यानंतर आपल्याकडून चूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ते ट्विट डिलीट करत दुसरी पोस्ट केली.ट्विटरवर घडलेल्या प्रकारामुळे गोपिचंद पडळकर यांना सोशल मीडियात नेटकऱ्यांनी अक्षरश: ट्रोल केले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर ट्विट डिलीट करण्याची नामुष्की ओढावली. त्याचबरोबर नटेकऱ्यांनी लोकमान्य टिळकांचे नामकरण कधी झाले? फोटो टिळकांचा जयंती आगरकरांची अशा शब्दात त्यांना ट्रोल केले आहे. यानंतर गोपीचंड पडळकर यांनी आगरकरांना अभिवादन करणारी पोस्ट टाकल्याचे दिसून येत आहे. दरम्यान गोपिचंद पडळकर यांनी उलट आरोप करत माझ्या ट्विटरवर मी गोपाळ गणेश आगरकरांचा फोटो पोस्ट करत अभिवादन केले, पण अशाप्रकारचे फोटो राष्ट्रवादीच्या लोकांकडून जाणुनबुजून व्हायरल करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here