कोरोना व्हायरसचा धुमाकूळ अद्याप कायम आहे. जगभरातील कोरोना बाधितांची आकडेवारीही छातीत धडकी भरवणारी आहे. जागतिक आरोग्य संघटननं आता कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या धर्तीवर नुकताच धक्कादायक इशारा दिला आहे.

कोरोनामुळं बदललेलं जनजीवन आता पूर्ववत होणं अशक्य आहे. भविष्यात पूर्वीचं ‘नाॅर्मल लाईफ’ आता कधीच परतणार नसल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहोम यांनी व्यक्त केलं आहे. यामुळे आता ‘न्यू नाॅर्मल’ या संकल्पनेचा स्वीकार करूनच आपल्याला जगावं लागणार आहे.

कित्येक देशांची परिस्थिती गंभीर वळणावर जाऊन पोहचली आहे. कोरोनाच्या उपाययोजनांकडे यापुढेही दुर्लक्ष केलं गेलं तर नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा WHO कडून नुकताच देण्यात आला आहे.

दरम्यान, जगभरातील अनेक देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ सुरू आहे. थंडीच्या दिवसात कोरोनाचं संक्रमण चिंता व्यक्त करणारं आहे. थंडीच्या दिवसात कोरोनाचा फैलाव वेगानं होऊ शकतो, असं मतही आता काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here