येत्या सहा महिन्यांत बुडीत कर्जात होऊ शकते मोठी वाढ : रघुराम राजन

0
258

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा भारतातल्या बुडीत कर्जांसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, येत्या सहा महिन्यांत बँकांच्या एनपीए-नॉन परफॉर्मिंग ऍसेट मध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. तसेच ही समस्या जितक्या लवकर ओळखली जाईल, तितकंच फायदेशीर ठरेल. कोरोनासाठी लॉकडाऊन आणि त्यातील कंटेन्टमेंटमुळे कंपन्यांवर नकारात्मक परिणाम झाला आहे आणि त्यापैकी बर्‍याच जणांना कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्यात अडचणी येत आहेत. रघुराम राजन यांनी नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) आयोजित इंडिया पॉलिसी फोरम २०२०च्या अधिवेशनात सहभाग घेतला होता. त्यावेळी ते बोलत होते. जर आम्हाला खरोखरच एनपीएची वास्तविक पातळी समजली, तर पुढील सहा महिन्यांत एनपीएची पातळी अगदीच अनपेक्षित होईल.

राजन म्हणाले की, जनधन खात्याची जाहिरात झाली, त्याप्रमाणे काम झाले नाही. भारतीय अर्थव्यवस्थेचे एक सकारात्मक परिणाम म्हणजे कृषी क्षेत्र आहे. हे क्षेत्र खरोखर चांगले काम करत आहे. अर्थातच मोदी सरकारने सुधारणांना वाव दिला आहे. तत्पूर्वी या सुधारणांची बराच काळ चर्चाच होत होती, आता त्यांची अंमलबजावणी झाल्यानं अर्थव्यवस्थेचा तो मोठा भाग ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here