मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील 18 रूग्ण कोरोनामुक्त

0
537

(सिंहगड मित्र टीम)

पुणे: पुणे महानगरपालिका कोविड केअर अधिकृत असलेल्या सिंहगड रोड परिसरातील मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधून दि. 16 जुलै रोजी 18 कोरोना रूग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये लहान 4 वर्षा वयाच्या बालकापासून ते वय वर्ष 60 पर्यंतच्या रूग्णांचा समावेश आहे. कोरोनाची भिती मनाशी बाळगून हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर आज अतिशय आनंदी वातावरणात पुन्हा घरी जाण्यास उत्सुक असलेल्या रूग्णांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. सायं 5 च्या दरम्यान पुष्पवृष्टी करून सर्व 18 रूग्णांना घरी सोडण्यात आले. त्यांना गृह विलगीकरणाचा शिक्का मारून पुढील 10 दिवस काळजी घेण्यासही सांगण्यात आले. असे मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अजितसिंह पाटील यांनी सांगितले.
मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स व डॉक्टरेत्तर कर्मचार्‍यांकडून आमची आपुलकीने काळजी घेतल्याचेही काही रूग्णांनी सांगितले.
मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एकूण 48 बेडस् असून त्यापैकी 27 बेडस् हे कोरोना रूग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 2 व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. तर जवळपास 60 कर्मचारी हे 24 तास रूग्णांच्या सेवेस तत्पर असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here