कोरोना चाचणी आता घरीच शक्य, ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीला मिळाले मोठे यश

0
279

कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीमध्ये सर्वात पुढे असलेल्या ऑक्सफोर्डला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीने ब्रिटनच्या प्रमूख फर्म्ससोबत मिळून गेम चेजिंग अँटीबॉडी टेस्ट किट तयार केली आहे. या किटला एका प्रमुख ट्रायलमध्ये यश मिळाले आहे. या टेस्टद्वारे अगदी कमी वेळेत असंख्य लोकांची चाचणी करणे शक्य होईल. यासाठी लॅबची देखील गरज पडणार नाही.

ऑक्सफोर्डच्या ज्या अँटीबॉडी टेस्टला (AbC-19 lateral flow test) यश मिळाले आहे त्याला ब्रिटन सरकारचे समर्थन आहे. आता सरकार या अँटीबॉडी टेस्ट किटचे मोठ्या प्रमाणात वितरण करण्याची योजना बनवत आहे.

नवीन अँटीबॉडी टेस्ट किटमुळे लोक सहज घरी देखील चाचणी करू शकतील. ट्रायल दरम्यान समोर आले की ही अँटीबॉडी टेस्ट किट 98.6 टक्के अचूक आहे. याचे ट्रायल जवळपास 300 लोकांवर करण्यात आले. नवीन टेस्ट किटद्वारे लोक घरीच केवळ 20 मिनिटांमध्ये चाचणी करून कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही याची माहिती घेतील. या आधी ब्रिटनमध्ये जे अँटीबॉडी टेस्ट होत होते, त्यात रक्ताचे नमुने लॅबमध्ये पाठवावे लागत असे.

ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक सर जॉन बेल म्हणाले की, ही रॅपिट टेस्ट किट चांगली आहे. दरम्यान, रिझल्ट येण्याआधीच फॅक्ट्रीमध्ये लाखो टेस्ट किट तयार केले जात आहेत. काही दिवसातच या किटला अधिकृत मंजूरी मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here