कॅफे कॉफी डे अर्थात सीसीडी ने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) साधारण २८० आऊटलेट्स बंद केली आहेत. नफ्याशी संबंधित मुद्द्यांमुळे आणि भविष्यातील खर्चात होणारी वाढ लक्षात घेता कंपनीने हे आऊटलेट्स शॉप्स बंद केली आहेत. ही स्टोअर बंद झाल्यानंतर ३० जून, २०२० रोजी कंपनीच्या एकूण आऊटलेटची संख्या १ हजार ४८० इतकी होती. कॉफी डे ग्लोबलकडे सीसीडीची मालकी असून या कॉफी डे एंटरप्राइजेज लिमिटेडची (सीडीईएल) उपकंपनी आहे.

कॉफीच्या या आऊटलेट्स साखळीत दररोज सरासरी विक्री कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार एप्रिल ते जून या काळात त्याची सरासरी दैनंदिन विक्री १५ हजार ४४५ होती, जी मागील वर्षातील तिमाहीत १५ हजार ७३९ होती. दरम्यान, या तिमाहीत कंपनीच्या वेंडिंग मशीनची संख्या वाढून ५९ हजार ११५ युनिट झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ती ४९ हजार ३९७ युनिट्स इतकी होती.

‘कमी मार्जिन आणि अधिक कार्यशील भांडवलाची गरज यामुळे निर्यातीसंदर्भातील कामे तात्पुरती थांबविण्यात आली आहेत.’ या गेल्या तिमाहीत नफ्यातील संभाव्य वाढ आणि मोठ्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर सुमारे २८० आऊटलेट्स अर्थात दुकानं बंद करण्यात आली आहेत.’, असे कंपनीने सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here