‘काळ’ आला होता पण पुणे पोलिसांनी ‘वेळ’ येऊ दिली नाही

0
303

पुणे: लॉकडाऊनच्या काळात विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस नायक अजित टेंभेकर व पोलिस शिपाई सुशांत रणवरे हे दोघे जण टिंगरे नगरमध्ये गस्त घातल होते. तितक्यात त्यांना एका बंद दुकानाच्या बाहेर फुटपाथवर पडलेला एक माणूस दिसला. तो हालचाल करत नव्हता. आजूबाजूच्या कोणालाच त्याच्या बद्दल माहिती नव्हती. बरं, त्याला हात लावायचा तरी कसा, तो कोरोना पॉझिटिव्ह असला तर शेवटी आधी 108 नंबर फिरवून अॅम्ब्युलन्स बोलवली. पोलिसांनी नंतर आपल्या सहकाऱ्यांना मदतीही मागितली. नंतर मास्क, हात मोजे घालून टेंभेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला हलवून पाहिलं. त्याच्यात कोविडची लक्षणे दिसली नाही. मग त्याला उठून बसवलं. पाणी पाजलं. तोपर्यंत अॅम्ब्युलन्स आली आणि त्या माणसाला ससून हॉस्पिटलला दाखल केलं.

दुसऱ्या दिवशी त्या माणसाची चौकशी करण्यासाठी टेंभेकर ससून हॉस्पिटलमध्ये पोहोचलंय तेव्हा त्यांना समजलं की, या व्यक्तीच्या पोटात गेल्या तीन दिवसांपासून अन्नाचा कणही नव्हता. त्याच्या शरीरातील पाणी कमी झालं होतं. तो जवळ जवळ मेल्यात जमा होता. पण, त्याला वेळेवर हॉस्पिटलमध्य आणल्यानं त्याचे प्राण वाचू शकले, असं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच त्याची कोरोना चाचणी देखील निगेटिव्ह आल्याचं डॉक्टकांनी सांगितलं. हे ऐकून टेंभेकरांना खूप समाधान वाटलं. कारण त्या व्यक्तीचा काळ आला होता पण टेंभेकर आणि रणवरें या पोलिस कर्मचाऱ्यांनी वेळ येऊ दिली नाही.

त्या व्यक्तीसाठी देवदूत बनून आलेल्या पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता पोलिस संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here