गडचिरोलीत 71 एसआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण

0
160

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गडचिरोलीमध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. विलगीकरणात ठेवलेल्या 71 एसआरपीएफ जवानांनी कोरोनाची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 424 झाली असून यामध्ये सुमारे 286 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 173 जण कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी सुद्धा परतले आहे. सध्या जिल्ह्यात 250 रुग्णांवर उपचार सुरू असुन, एक जणाचा दुर्दैवाने कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here