“हिंमत असेल तर सरकार पाडा” उद्धव ठाकरे यांचे भाजपला आव्हान

0
79

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह विरोधकांना हिंमत असेल तर माझी मुलाखत सुरु आहे, सरकार पाडून दाखवा, असं थेट आव्हान दिलं आहे (CM Uddhav Thackeray challenge BJP). सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं. ते म्हणाले, ‘मी इथं बसलो आहे, हिंमत असेल तर मुलाखत सुरु असताना सरकार पाडा.’ ही मुलाखत सामनाकडून शनिवारी (25 जुलै) आणि रविवारी (26 जुलै) प्रसारित केली जाणार आहे. त्यापूर्वी संजय राऊत यांनी या मुलाखतीचा ट्रेलर ट्विट केला आहे. यात मुख्यमंत्री आक्रमकपणे विरोधकांना सडेतोड उत्तरं देताना दिसत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामनातील मुलाखतीची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील अनेकांना उत्सुकता आहे. संजय राऊत यांनी मुलाखतीचा ट्रेलर टाकल्यानंतर या मुलाखतीची उत्सुकता आणखीच वाढल्याचं दिसत आहे. या ट्रेलरमध्ये संजय राऊत उद्धव ठाकरे यांना विरोधक महाविकासआघाडी सरकारला तीनचाकी सरकार, रिक्षा म्हणत असल्याचा मुद्दा उपस्थित करतात. यावर उद्धव ठाकरे यांनी केंद्रात मोदी सरकारसोबत आलेल्या मित्रपक्षांच्या संख्येवर बोट ठेवत केंद्रात किती चाकी सरकार आहे? असा प्रतिप्रश्न विचारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here