कोरोना संकटात केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक मदत

0
114

मुंबई: कोरोना संकटात केंद्र सरकारकडून  महाराष्ट्राला  सर्वाधिक मदत  मिळाली आहे. राज्याला केंद्राकडून २१.८४ लाख एन ९५ मास्क, ११.७८ लाख पीपीई किट, ७७.२० लाख हायड्रोक्लोरिक्वीन टॅब्लेट (एचसीक्यू टॅब्लेट) आणि १८०५ व्हेंटिलेटर मिळाले आहेत.

प्रत्येक राज्यातील कोरोना संकटाच्या तीव्रतेचा विचार करुन केंद्र सरकारने मदत दिली आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातील प्रत्येक राज्याला मदत दिली आहे. देशातील सर्व राज्यांना मिळून केंद्राने २.१८ कोटी एन ९५ मास्क, १.२१ कोटी पीपीई किट, ६.१२ कोटी हायड्रोक्लोरिक्वीन टॅब्लेट (एचसीक्यू टॅब्लेट) आणि ९,१५० व्हेंटिलेटर दिले आहेत. या मदतीतला सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राला देण्यात आला आहे.

भारतात कोरोना रुग्णांची राज्यांच्या पातळीवर आकडेवारी संकलित करुन दररोज जाहीर करण्याची पद्धत २५ मार्च पासून सुरू झाली. ही पद्धत सुरू झाल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधीत आढळले आहेत. राज्यातले कोरोना संकट लवकर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here