राज्यात आतापर्यंत पोलीस दलातील 8232 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 861 पोलीस अधिकारी तर 7371 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच कोरोनामुळे 93 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 7 अधिकारी आणि 86 पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.कोरोनातून 6314 पोलीस बरे झाले आहेत. यामध्ये 640 अधिकारी आणि 5674 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या 1825 पोलिसांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणं आहेत. यामध्ये 214 अधिकारी 1611 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.