बंगळुरू, 26 जुलै : देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 48 हजार 661 नवीन रुग्ण सापडले, तर 705 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्खा 13 लाख 85 हजार 522 झाली आहे. यात कर्नाटक राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 90 हजार पार झाली आहे. यासगळ्यात राज्याची राजधानी बंगळुरूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळुरूमधून तब्बल 3 हजार 338 कोरोना रुग्ण गायब झाले आहे. हे रुग्ण कुठे गेले, याबाबत कोणालाच माहिती नाही आहे.

सध्या प्रशासन, बेपत्ता झालेल्या या 3 हजार 338 रुग्णांचा शोध घेत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे रुग्णांना ट्रॅक करण्याचे कोणतेही साधन नाही आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या सर्व रुग्णांनी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे की नाही? याबाबतही प्रशासनाला कोणतीही माहिती नाही आहे.

बंगळुरू महानगरपालिकेचे आयुक्त एन मंजुनाथ प्रसार यांनी सांगितले की, “कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यासाठी आम्ही पोलिसांची मदत घेतली आहे. मात्र बेपत्ता झालेले 3 हजार 338 रुग्णांना शोधणं कठिण आहेत. काही रुग्णांनी फोन नंबर आणि पत्ते चुकीचे दिले आहे. कोरोना झाल्याचे भीतीने किंवा क्वारंटाइन होण्याच्या भीतीने हे लोकं बेपत्ता झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे”. एकूण कर्नाटक राज्यातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण बंगळुरूत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here