चंपा, टरबुज्या आता खपवून घेतले जाणार नाही.- चंद्रकांत पाटील

0
144

भाजप आणि महाविकास आघाडीत सोशल मीडियामध्ये जोरदार शाब्दिक वार सुरु असतो. महाविकास आघाडीचे कार्यकारी भाजप नेत्यांना तर भाजपचे आघाडीच्या नेत्याना ट्रोल करतात. मात्र आता यावर आक्रमक होण्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ते काल भाजपच्या पहिल्या प्रदेश कार्यकरिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, यापुढे पक्षनेत्यांविरूद्ध अश्लील भाषा वापरली तर खपवून घेतले जाणार नाही. कोणी चंपा म्हणतो तर कोणी टरबुज्या म्हणत. शांत बसणे म्हणजे स्वीकारणे होय. म्हणूनच, अशा लोकांविरुद्ध प्रत्येकाने सूड उगवायला हवे, परंतु सूड घेताना असे शब्द वापरा जेणेकरून विधान मागे घेण्याची शक्यता नसेल.

पाटील म्हणाले, राज्यात भाजपाचे सरकार येणार की नाही या चर्चेत कुणी जाऊ नये. आपल्याला एक प्रचंड राजकीय लढाई लढवावी लागेल. कोरोना संकटात महाविकास आघाडी सरकारने भ्रष्टाचार केला आहे. आगामी काळात भ्रष्टाचाराचा मुद्दा पक्ष जोरदार उपस्थित करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here