नाशिकमध्ये मानसिक रूग्णांसाठी मोफत समुपदेशन

0
129

नाशिक महापालिका, भोंसला कॅम्पस आणि नाशिक सायकॅट्रीक सोसायटीचा संयुक्त उपक्रम
9607532233 आणि 9607735132 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे अवाहन

तेजस्विनी लोणकर (प्रतिनिधी नाशिक)

कोरोनाच्या ह्या काळात लोकांमध्यें मानसिक तणाव खूप जास्त निर्माण झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांमध्ये खूप जास्त चिंताक्रांत पसरला आहे. स्वतःची व कुटुंबाची काळजी वाटणे हे स्वाभाविक झाले आहे. पण हीच काळजी जर मानसिक तणाव, अवास्तव चिंता या भितीमध्ये होत असेल तर हे मानसिक आरोग्यसाठी चांगले नाही. मानसिक आरोग्य हा आजच्या काळात खूपच महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे. झोप न येणे, एकटे वाटणे, निराश वाटणे, आयुष्य संपवण्याची मनात इच्छा होणे, हृदयात धडधड सुरू आहे असे वाटणे, सध्या यासारख्या समस्यांना लोकांना समोर जावे लागत आहे.
मानसिक आरोग्य या एका महत्त्वाच्या मुद्यावर नाशिक महापालिका, भोंसला कॅम्पस आणि नाशिक सायकॅट्रीक सोसायटी या तिन्ही संस्थेने लोकांना त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी मोफत निराकरण करण्याचे ठरवले आहे.
मानसिक तणाव अनुभवकर्त्या व्यक्ती किवा कुटुंबांना मोफत हेल्पलाइनद्वारे सविस्तर मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या तिन्ही संस्थांनी घेतली आहे.
यासाठी लोकांना सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत 9607532233 आणि 9607735132 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल. या करारावर महापालिकेकडून आरोग्य अधिकारी, नाशिक सायकॅट्रीक सोसायटीचे डॉ. उमेश नागापूरकर आणि भोंसला मिलिटरी कॉलेजचे प्राचार्य डॉ. यु. वाय. कुलकर्णी यांनी स्वाक्षरी केली.
त्यानुसार महापालिका आरोग्य विभाग हा या कार्यात सहभागी होणार्‍या लोकांना प्रशिक्षण देणे, लोकांच्या प्रबोधन, प्रोत्साहनासाठी नाशिक सायकॅट्रीक सोसायटीच्या मदतीने मोठ्या संख्येने छोटे छोटे ध्वनिसंदेश तयार करणे, ध्वनी चित्रफीत संदेशातून माहिती पोहोचविण्याचे काम करणे, याशिवाय तणावातून जात असणार्‍या व्यक्तींना नाशिक सायकॅट्रीक सोसायटीकडे मानसोपचार तज्ञ डॉक्टरांकडे पाठवणे, समाजात तणावविरहित आणि आरोग्यासाठी पोषण उत्साही वातावरण तयार करण्यासाठी काम करण्याचे ठरवले आहे.
तसेच नाशिक सायकॅट्रीक सोसायटीकडे व्हिडिओ मीटिंग अ‍ॅपद्वारे प्रशिक्षण देणे, मानसिक तणावातून जाणार्‍या रुग्णांचे समुपदेशन करणे, आत्महत्येसारख्या प्रकारांना प्रतिबंध बसावा आणि समाजात उत्साही आणि आरोग्यदायी वातावरण राहावे अशी जबाबदारी सोसायटीची असणार आहे.
भोंसला कॅम्पसचाही या प्रकियेत प्रमुख सहभाग असेल. मानसिक आणि भावनिकदृष्ट्या त्रस्त असणार्‍यांना ओळखून त्यांना हेल्पलाइनद्वारे त्वरित मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, हेल्पलाइनद्वारे आलेल्या सर्व बाबींच्या नोंदी ठेवणे, रुग्णांची गरज व आवश्यकतेनुसार नाशिक सायकॅट्रीक सोसायटीकडे पाठवणे, तत्काळ सेवेसाठी लोकांना आवाहन करून वाहने उपलब्ध करून देणे, या कामांबरोबरच समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी भोंसला कॅम्पससवर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here