जान्हवी… आईबापाच्या कष्टाचं चिज केलंस..!

0
263

महेश फासे (विटा प्रतिनिधी)

घरची परिस्थिती बेताचीच.. अशापरिस्थितीत सुध्दा दहावीला असलेल्या आपल्या मुलीला शिक्षणात नेहमीच पुढे राहण्यासाठी आईबापानी केलेली वढाताण फळास आली असेच म्हणावे लागेल.
आई – बाबा हे दोघेही सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कष्ट करतात. आई खासगी संस्थेत नोकरीला तर बाबा विमा एजंट दोघांच्या उत्पन्नात आपल्या 2 मुलांचा सांभाळ आणि शिक्षण ही तारेवरील कसरत करत असतानाच आज त्यांनी गाळलेल्या घामाचे, घेतलेल्या कष्टाचं चीज झाल्याचे समाधान त्याच्या आनंदी चेहर्‍यावर दिसून येत होतं.
आज दहावीचा निकाल जाहीर झाला विटा हायस्कूल येथे दहावीचे शिक्षण घेणारी जान्हवी सचिन पतंगे या विद्यार्थीनीला 500 पैकी 489 गुण मिळाले. जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर या मुलीने 97.80 टक्के गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान पटकावलाय.
जान्हवीचे वडिल पहाटे 4 वाजता उठून तिचा अभ्यास घ्यायचे याचेच  फळ मिळाल्याचे जान्वहीची आई दिपाली पतंगे यांनी सांगितले. आई बाबांच्या अथक परिश्रम, माझा अभ्यास व विटा हायस्कूलच्या शिक्षकांचे मार्गदर्शन यांमुळेच मला हे शक्य झाल्याचेही जान्हवीने सांगितले. तिच्या या यशामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जान्हवीच्या या यशानिमित्त सिंहगड मित्र न्यूज परिवारातर्फे खूप खुप शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here