देवळालीत बिबट्या पिंजर्‍यात कैद

0
137

तेजस्विनी लोणकर (नाशिक प्रतिनिधी)

देवळाली येथील लष्करी हद्दीत गेल्या वर्षभरापासून विविध भागात दिसणारा नर बिबट्या लष्करी हद्दीतील एमटी बॅटरी परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात कैद झाला आहे.
या बिबट्याने अनेक दिवसांपासून शिंगवे बहुला, लष्कर रेंज परिसर, बार्न्स स्कूल परिसरात वारंवार नागरिकांना दर्शन दिले होते जेणेकरून लोकांमध्ये खूप जास्त भीती निर्माण झाली होती. याशिवाय अनेक मुकी जनावरे याच्या भक्षस्थानी पडली आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक या बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असतांना सावज टिपण्याच्या आशेने आलेला हा बिबट्या अलगद वन विभागाच्या पिंजर्‍यात अडकला. बुधवारी गस्तीवर असलेल्या लष्करी जवानांना डरकाळी ऐकू आल्यानंतर बिबट्या पिंजर्‍यात अडकला असल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी वन विभागाशी संपर्क साधल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या सूचनेनुसार वन परिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, वनरक्षक विजय पाटील आदींनी बिबट्यासह पिंजरा ताब्यात घेत त्याची रवानगी गंगापूर रोडवरील वन विभागाच्या नर्सरीमध्ये केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here