‘तारक मेहता का उल्टा चश्‍मा’ मधून अंजलीची एक्‍झिट?

0
271

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेली ‘तारक मेहता का उल्टा चश्‍मा’ ही मालिका एका दशकापासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. त्यामुळेच ही मालिका टीआरपीमध्ये इतर मालिकांच्या तुलनेत कितीतरी पट वरचढ ठरत आहे. या मालिकेला नुकतेच 12 वर्षे पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन सुद्धा दाखवण्यात आले होते, पण आता या मालिके संदर्भातील एक मोठी माहिती समोर आली आहे.

मालिकेत तारक मेहता यांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या अंजली मेहता अर्थात नेहा मेहता यांनी मालिकेतून काढता पाय घेतल्याचे समजते, पण निर्मात्यांकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.

या संदर्भात निर्मात्यांना आपण शो सोडत असल्याबाबत नेहाने कळवले आहे. शोच्या शूटिंगला 10 जुलैपासून सुरुवात झाली आहे, तेव्हापासून नेहा मेहता शूटिंगला आलेल्या नाहीत. 22 जुलैपासून शोचे पुन्हा प्रक्षेपण सुरू झाले आहे. अंजली मेहता आणि तारक मेहता हे मालिकेतील एक महत्त्वाचे पात्र आहे. डाएटमुळे नवऱ्याच्या मागे हात धुवून लागलेली अंजली हुशार पण तितकीच भावुक दाखवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here