नाशिक जिल्ह्यात ‘ वंदे भारत मिशन’ यशस्वी

0
166

तेजस्विनी लोणकर (नाशिक प्रतिनिधी)

कोरोना काळात परदेशात अडकून पडलेल्या 791, नाशिककरांची केंद्र सरकारच्या ’वंदे भारत मिशन’ अंतर्गत घरवापासी झाली आहे. सरकारच्या निर्देशानुसार सात दिवसांचा क्वारंटाइन हॉटेल्समध्ये राहून पूर्ण करून नागरिक आपापल्या घरी परतत आहेत.
नोकरी आणि व्यवसाय निमित्त अनेक नाशिककर परदेशात वस्तव्यास आहेत आणि अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे स्वतःच्या देशात आणि घरात परत यायची इच्छा होती. परदेशात अडकलेल्या व देशात परतू इच्छिणार्‍या भारतीयांना मायभूमीत आण्यासाठी केंद्र सरकारने वंदे भारत मिशन हाती घेतले.
गेल्या दीड महिन्यापासून या मिशन अंतर्गत परदेशात नोकरी, शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी, पर्यटक तसेच कामानिमित्त गेलेल्या व्यक्तींना देशात परत आणण्याची मोहीम सरकारनी सुरू केली.
जिल्ह्यात आतापर्यंत 791 नागरिक परतले आहेत. या सर्व नागरिकांना ब्रिटन, रशिया, सिंगापूर, दुबई, कोलंबो, मलिना, बँकॉक, आर्यलँड, क्वालालांपूर, मस्कत, पॅरिस, सॅनफ्रान्सिस्को, कझाकिस्तान, बांगलादेश, टांझानिया, कुवेत आदी ठिकाणांहून विशेष विमानाने तसेच जहाजामार्गे भारतात सुखरूप परत आणण्यात आले आहे.
परदेशातून परतणार्‍या नागरिकांना शहरातील निश्चित केलेल्या 13 हॉटेलपैकी एका हॉटेलमध्ये सात दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावे लागते. या काळात त्यांची दररोज आरोग्य पथकामार्फत तपासणी केली जाते. सात दिवसानंतर कोणतीही लक्षणे नसल्यास त्यांना घरी सोडण्यात येते. त्यानुसार या नागरिकांनाही घरी सोडण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here