पुण्यात इयत्ता अकरावी ची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू.

0
53

टीम सिंहगड मित्र

पुण्यात आज ( शनिवार) पासून अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहेपुणे, पिंपरी चिंचवड याभागात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षीपासून गुणपत्रिकेद्वारे फार्म भरता येणार असून इतर कागद पत्रांची सक्ती करण्यात आलेली नाही. कोरोनामुळे इतर कागद पत्रांसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

प्रवेशापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी ही सूट देण्यात आल्याचेही शिक्षण विभागाने सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी इतर कागदपत्रे असतील तर ती अपलोड केली तरी चालणार आहेत.

तसेच क्रीडा प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, बदली आदेश आदी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांनी अर्ज भरतेवेळी अपलोड करणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

पुण्यात आज ( शनिवार) पासून अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड याभागात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षीपासून गुणपत्रिकेद्वारे फार्म भरता येणार असून इतर कागद पत्रांची सक्ती करण्यात आलेली नाही. कोरोनामुळे इतर कागद पत्रांसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

प्रवेशापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी ही सूट देण्यात आल्याचेही शिक्षण विभागाने सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी इतर कागदपत्रे असतील तर ती अपलोड केली तरी चालणार आहेत.

तसेच क्रीडा प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, बदली आदेश आदी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांनी अर्ज भरतेवेळी अपलोड करणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here