प्रफुल्ल जवरे [ प्रतिनिधी मुक्ताईनगर]
दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजप आणि मित्रपक्षांनी महायुतीच्या माध्यमातून राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची हाक दिली आहे.मुक्ताईनगर येथे भाजप+मित्रपक्षांचे महायुतीच्या वतीने राज्यवापी आंदोलन पार पडले.
लॉकडाऊनच्या काळात सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना या काळात मोठा फटका बसला. अजूनही दुधाला योग्य भाव मिळत नाहीये. गायीच्या दुधाला 30 रुपये दर मिळाला पाहिजे परंतु सध्या शेतकऱ्यांना लिटरमागे 20 रूपये सुद्धा मिळत नाहीये. सरकारने यासाठी प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यायला हवं. आमचे सरकार सत्तेत असताना शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान दिलं होतं. दूध पावडरचा विषय केंद्र सरकारचा असेल तर राज्य सरकारने तसं प्रपोजल बनवून पाठवावे. केंद्र सरकार करेल. अशी माहिती खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
माजी मंत्री एकनाथरावजी खडसे, माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुक्ताईनगर येथे आंदोलन करताना खासदार रक्षाताई खडसे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभिनयाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्रजी फडके, जेडीसीसी बँक चेअरमन ऍड रोहिणीताई खडसे-खेवलकर, माजी जि प अध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर, जि प समाज कल्याण सभापती जयपालभाऊ बोदडे, तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, बाजार समिती सभापती निवृत्तीभाऊ पाटील, प स सभापती प्रल्हादभाऊ जंगले, प्र सभापती विद्याताई पाटील,जिल्हा चिटणीस राजुभाऊ माळी,माजी तालुकाध्यक्ष दशरथ भाऊ कांडेलकर, जि प सदस्य निलेशभाऊ पाटील, वैशालीताई तायडे, उपनगराध्यक्ष मनीषा ताई पाटील, प स सदस्य विकास पाटील, प्रदीप साळुंखे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अंकुश पाटील,तालुकाप्रसीध्दी प्रमुख शिवराज पाटील, शहराध्यक्ष मनोज तळेले,सरचिटणीस चंद्रकांत भोलाने, सुनिल काटे,डॉ. खिरोळकर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.