फूड सेफ्टी परवान्यांच्या नूतनीकरणाला ३१ डिसेंबर पर्यंत  मुदत वाढ .

0
96

टीम सिंहगड मित्र

‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडल ‘ च्या प्रयत्नांना यश

फूड सेफ्टी अँड  स्टँडर्ड्स ऍथॉरिटी ऑफ इंडिया ‘(fssai) कडून फूड सेफ्टी परवान्यांच्या नूतनीकरणाला ३१ डिसेंबर २०२० पर्यंत  मुदत वाढ देण्यात आली आहे. ३१ जुलै २०२० रोजी ही नूतनीकरणाची मदत संपणार होती. ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडल ‘ च्या  शिष्टमंडळाने मुदतवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडल ‘  चे  राष्ट्रीय अध्यक्ष जयेंद्र टण्णा, महासचिव    व्ही के बन्सल ,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

कोरोना साथीच्या संकटात खाद्यान्न ,पेय निर्मिती क्षेत्रातील उदयॊगाना आपले उत्पादन सलग ५ महिने बंद ठेवावे लागले होते. त्यामुळे अडचणींचा विचार करून  फूड सेफ्टी विषयक परवान्यांचे नूतनीकरण करण्यास  मुदतवाढ द्यावी ,अशी मागणी फेडरेशन ने सातत्याने केली होती. यासाठी फेडरेशन च्या शिष्ट मंडळाने फूड सेफ्टी अँड  स्टँडर्ड्स ऍथॉरिटी ऑफ इंडिया ‘ च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता.

या क्षेत्रातील उद्योगांनी त्यांचे वार्षिक विवरण पत्र जमा करण्यासही ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here