‘ ऑनलाईन शिक्षणाचा फंडा , गरीब विद्यार्थ्यांचा झाला वांदा.’

0
201

अक्षय झणझणे[फलटण प्रतिनिधी]

खेड्यापाड्यातील नव्हे तर अगदी डोंगर भागात राहणाऱ्या मुलांपर्यंत शिक्षण पोहचावे म्हणून भारत सरकारने ‘सर्व शिक्षण अभियान’ सुरू केले, यामध्ये ६ ते १४ वयोगटातील कोणीही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पहिली ते आठवी मोफत शिक्षणाची सोय केली.
शिक्षणाला खरं तर खूप महत्त्व आहे, आपलं मूल कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये म्हणून पालकांची कायम धडपड सुरू असते.त्यासाठी सरकारी शाळांसोबत च आता खाजगी शाळांचे प्रमाणात ही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या जास्त पाहायला मिळते.
बघायला गेलं तर खाजगी शाळांमध्ये शिक्षणापेक्षा इतर खर्च जास्त असतो. त्यामध्ये ड्रेसकोड , महागडी वह्या- पुस्तके, दप्तर , इतकेंच नव्हे तर सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेत इतर कौशल्य वाढविणारे क्लासेस त्यामध्ये संगीत , नृत्य यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळे अश्या शाळांमध्ये शिकणारी मूल बाहेर चमकत असतात असा गोड गैरसमज समाजामध्ये निर्माण होताना दिसतो आहे.
आजचा डिजिटल युगामध्ये शिक्षणही डिजिटल झाले आहे. त्यासाठी आधुनिक उपकरणांची गरज ही लागतेच. उदा. स्मार्टफोन, लॅपटॉप , टॅब अशी उपकरणे सर्व सामान्य जनतेला परवडणारी नाहीत. हातमजुरी करणारे व अत्यल्प उत्पादन करणाऱ्या लोकांना या गोष्टी कशा काय परवडू शकतील..?
पण त्यांनाही आपली मुलं शिकावी असे वाटत असते व या भावनेतून पोटाला चिमटा काडून पालक आपल्या पाल्याला सरकारी किंवा निमसरकारी शाळेत घालतात. सध्या कोरोना सारख्या महामारी मुळे शाळा कॉलेज सुरू कराव्यात की करू नयेत, असा मोठा प्रश्न समोर ठाकला आहे. ‘शिक्षण’ थांबवायचे नाही असा निर्णय सरकारने घेतला जरी असला त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षण कितीही सोयीस्कर आणि चांगले वाटत वाटत असले तरी, यामध्ये काही विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत.
ऑनलाईन शिक्षण देत असताना एखादा शिक्षक विषय समजून सांगतील किंवा लेक्चर देतील ही पण तो विषय एखाद्याला किती समजला हे कसे कळणार….? या बद्दल सरकारने विचार केला आहे का.?
फक्त ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचे आदेश देण्याचे काम मात्र चोखपणे केलेलं आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यापूर्वी या अंध सरकारने किती विद्यार्थी ह्या शिक्षण पद्धतीचा लाभ घेऊ शकतील ? किती मुलं ह्या पासून वंचित राहतील ?
अश्या गोष्टींमुळे सरकारच्या अश्या फसत्या योजना लोकांसमोर उघड होणार हे नक्कीच…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here