केमिस्टस आणि ड्रगिस्ट्स असोसिएशनची  ना-नफा -तोटा योजना .

0
54

तेजस्विनी लोणकर (नाशिक प्रतिनिधी)

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा एकदम वाढ एक चिंताजनक विषय झाला आहे आणि कोरोनाच्या औषधांचा महागडा खर्च बर्‍याच लोकांसाठी खूप त्रासदायक बनला आहे. तर ह्या गोष्टीची काळजी घेत नाशिक केमिस्ट्स आणि ड्रगिस्ट्स असोसिएशन कोविडशी संबंधित ना-नफा-तोटा या तत्त्वावर औषधे देण्याची योजना आखत आहे. केमिस्टस लोकं लवकरच मार्गदर्शनासाठी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकृतांची भेट घेणार आहेत.

नाशिक  केमिस्ट आणि ड्रगिस्ट्स असोसिएशनचे अतुल अहिरे म्हणाले: सामाजिक कर्तव्य म्हणून आम्ही नफा न तोटाच्या आधारावर महागड्या अ‍ॅक्टमेरासारख्या काही औषधे विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. काही औषधे बाजारात मिळणे देखील कठीण आहे, परिणामी आम्ही विक्री केंद्रीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहर व जिल्ह्यात कोविड -१९ चे प्रकरणे मोठ्या प्रमाणात आढळून आल्यामुळे रुग्ण मोठ्या संख्येने खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा रुग्णांच्या नातेवाईकांना बाजारातून औषधे खरेदी करावी लागतात. तर आता ह्या पुढे केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी ठरविलेल्या किंमतीवर काही महागड्या औषधांची विक्री केली जाईल. ह्या बाबत असोसिएशनचे पदाधिकारी अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांची मंजूरीची योजना स्पष्ट करतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here