शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी : मा. शेखर भोयर .

0
174

मारुती निदन ( धायरी प्रतिनिधी )
२००५ पूर्वीच्या अंशत: अनुदानित व विना अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी अशी विनंती शिक्षक महासंघ अमरावती विभागाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री महाराष्ट्राराज्य मा.ना.श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली.

खालील पार्श्वभूमी लक्षात घेता ही मागणी करण्यात आली आहे :
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत असलेल्या विना अनुदानित , अंशत: अनुदानित व २००५ नंतर सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी अशी लक्षवेधी सूचना मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब , मा.ना.श्री. धनंजयजी मुंडे साहेब , मा.ना.श्री. जयंतजी पाटील साहेब , मा. ना. श्री.विजयजी वडेट्टीवार साहेब , शिक्षक आमदार श्री. विक्रमजी काळे साहेब यांनी विधानसभा व विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात मांडली होती .
यावर सभापती महोदयांनी त्यांच्या दालनात दि.२६ नोव्हेंबर २०१९ रोजी बैठक घेतली होती . या बैठकीत मा. शिक्षण सचिव यांच्या अध्यक्षतेखाली वित्त विभाग तसेच विधी व न्याय विभागाचे सचिव यांची एक संयुक्त समिती गठीत करण्याचे ठरविण्यात आले होते .त्यानुसार २४ जुलै २०१९ च्या शासननिर्णयान्वे ही संयुक्त समिति गठीत करण्यात आली. त्यांना ३ महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे सुचविण्यात आले होते .
जर नवीन अंशदायी पेन्शन योजना १ नोव्हेंबर २००५ पासून लागु केली असेल तर १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या विना अनुदानित शाळा , टप्पा अनुदान शाळा व दि.१ नोव्हेंबर २००५ नंतर १०० % अनुदानावर आलेल्या शिक्षक व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे .
जुनी पेन्शन योजना यापूर्वी काही शिक्षकांना लागु सुध्दा झाली आहे तसेच काही शिक्षकांना लागु सुध्दा झाली आहे तसेच काही शिक्षकांची खाती उघडुन कपात सुध्दा सुरू आहे . तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी शिक्षण सेवक म्हणून सेवेत आलेल्या व १ नोव्हेंबर २००५ नंतर वेतनश्रेणी लागू झालेल्या शिक्षण सेवकांना सुध्दा मंत्रिमंडळाने सन २०११ मध्ये निर्णय घेऊन जुनी पेन्शन योजना लागु झालेली आहे. या सर्व बाबी समितीसमोर मांडण्यात आल्या आहेत . या समितीस आत्तापर्यंत आपला अहवाल सादर करण्यास ३ वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच या समितीस १ वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. तरीही समितीने अद्यापपावेतो आपला अहवाल सादर केला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here