कोरोना वैद्यकीय माहिती तीन प्रकारात मिळायला हवी : आमदार सिद्धार्थ शिरोळे.

0
115

 [पुणे प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.]

महानगपालिकेमध्ये कोरोना वैद्यकीय यंतरणेला चालना देण्यासाठी तीन कोविड सेंटर्स उभारण्यात आली आहेत. तरी आत्ता महानगपालिकेतर्फे जो रोजचा कोरोना बधितांचा अहवाल पाठवला जातो त्या मध्ये नव्याने भरती झालेले रुग्ण , गंभीर रूग्ण , मृत्यू , प्रत्यक्ष उपचार घेत असलेले रूग्ण यांची माहिती एकत्र देण्यात येते .

अश्या प्रकारे माहिती न देता, वैद्यकीय सुविधाचा अंदाज येण्यासाठी तीन प्रकारे माहिती मिळावी अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.
अहवालामध्ये प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या किती आहे ? रुग्णालयामध्ये किती उपचार घेत आहेत ?
आणि कोविड सेंटर मध्ये किती उपचार घेत आहेत ? अश्या स्वरूपात विभागून माहिती देण्यात यावी अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे .

यामुळे वैद्यकीय यंत्रणा किती सुसूज्ज आहे ते समजण्यास मदत होईल , त्याचसोबत रुग्णांची माहिती संकलित करता येईल व त्यानुसार काम करता येईल. आणि सेंटर उभारणी साठी जनतेचा पैसा खर्च होणार आहे, त्यामुळे काही त्रुटी मूळे जनतेचा पैसा वाया जाऊ नये.
अशी सूचना ही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ह्या वेळी आयुक्तांना केली

[पुणे प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here