पुढील आठवड्यात सिन्नर-शिर्डी रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू.

0
55

तेजस्विनी लोणकर (नाशिक प्रतिनिधी)
51 कि.मी. लांबीच्या सिन्नर-शिर्डी महामार्गाचे प्रलंबीत रस्ता रुंदीकरणाचे काम पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याने 80% जमीन अधिग्रहण पूर्ण झाले आहे.
प्रकल्प दोन वर्षात पूर्ण होईल. हा रास्ता ऑगस्ट २०२२ पर्यंत, वर्षभर शिर्डीकडे जाणार्‍या पालख्यांसाठी वेगळ्या जागेसह प्रवाशांना चार लेन रुंद रास्ता असेल.
ह्या बाबत वरिष्ठ अधिकायांनी सांगितले की, जमीन मालकांना नुकसान भरपाई देण्याचे कामही सुरू झाले आहे आणि ज्यांना त्यांच्या जागेच्या मोबदल्यात नुकसान भरपाईच्या संदर्भात काही आक्षेप असतील त्यांनाही एकाचवेळी ऐकले जाणार आहे.
सध्याचा 10 मीटर रुंद रस्ता 22 मीटरपर्यंत वाढविला जाणार तसेच महामार्गालगतच्या 5.5 मीटर रुंदीच्या पालखी मार्गासह मध्यम देखील असतील.
दरवर्षी देशभरातून लाखो भाविक शिर्डीच्या दिशेने जाताना दिसतात. या नवीन पालखी मार्गामुळे भाविकांना शिर्डीला जाणे सोयीचे होईल. यामुळे रस्ते अपघात कमी करण्यात मदत होईल, असे ही अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिर्डी हे देशातील सर्वाधिक दर्शनीय मंदिरांपैकी एक आहे, राज्यभर आणि देशभरातील भाविक वर्षभर साईबाबा मंदिराला भेट देतात. ते सहसा सरकारी किंवा खाजगी बसेस, खाजगी वाहने आणि कधीकधी मंदिरातील गावातून फिरतात तर हा मार्ग आता एक सोयीस्कर आणि चांगला मार्ग साबित होण्याची खातिरी अधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here