सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर; अतिवृष्टीची शक्यता.

0
156

टीम सिंहगड मित्र.

दोन दिवसांपासून मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर आजही मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे.
येत्या २४ तासांत मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर वाढणार असल्याने मुंबईतील सखल भागात पाणी साचण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने मुंबईकरांना कारण नसताना घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहेत.

दोन दिवसांपासून मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबईचं जनजीवन ठप्प झाले. रस्ते जलमय झाले, घरांमध्ये पाणी शिरले. रेल्वेरुळावर पाणी आल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली लोकल सेवाही ठप्प झाली.

मुंबईत काल सखल भागात कमरेच्यावर पाणी साचले. काल रेल्वे रुळांवर जवळपास तीन फुट पाणी साचल्याने कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट झाली. लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या ४५ जणांची तुकडी घटनास्थळी दाखल झाली.

मुंबई महापालिका क्षेत्रात जोरदार वाऱ्यांच्या तडाख्याने १४१ ठिकाणी झाडे उन्मळून पडली. या सर्वांची दखल घेऊन स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून या संकटात मी तुमच्यासोबत आहे, असे म्हटले असून केंद्र सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
आज सकाळी पावसाने काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा जोर धरला आहे. मुंबईत कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, सायन, दादर, वांद्रेसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि नवी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here