अतिवृष्टी! राज्यात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात.

0
88

टीम सिंहगड मित्र.

राज्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य सुरु झाले आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मुंबई, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासनाची आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे.

जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले आहे.

NDRF च्या 16 टीम
▪️ मुंबई 05, कोल्हापूर 04 , सांगली 02, सातारा 01, ठाणे 01, पालघर 01, नागपूर 01, रायगड 01 अशा एकूण 16 एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here