चोंडी गावकऱ्यांचा रेशन अडचण संपली नाही तर आत्मदहन करेन चा ईशारा.

0
76

विष्णुकांत गीते ( नांदेड जिल्हा प्रतिनिधी )

कोरोना महामारी चा काळात सर्व घटकांना मोफत रेशन मिळवुन देऊ अशी घोषणा सरकारने जाहीर केली होती.
तरी राज्यभरातील बऱ्याच गरिब, मध्यमवर्गीय घटकांपर्यन्त ही मदत अजून पर्यन्त पोहचलेली नसल्याचे दिसून येत आहे.
असाच एक प्रकार नांदेड जिल्ह्यातील चोंडी गावातील ता.लोहा मध्ये पाहायला मिळाला.
लोकांना ह्या लॉकडाऊन चा काळात उपासमारी ला सामोरे जावे लागले आहे. गावातील श्री. माधव लक्ष्मण मेकाले यांनी सर्वांना रेशन मिळावे या साठी तहसीलदार कार्यालय मध्ये दि. २६जुलै २०२० रोजी निवेदन देऊन मागणी केली होती.
सदर प्रकार लक्षात घेता, काल दि.६ऑगस्ट रोजी चोंडी गावामध्ये नाईप तहसीलदार यांनी भेट देऊन रेशन दुकानदार आनंदराव गीते यांचा दुकानाची पाहणी केली.

रेशन दुकानदार रेशन कार्ड धारकांना योग्य जे मिळाले पाहिजे तितके रेशन दिले जात नाही .
रेशन चा जो दर नेमला आहे त्या नुसार रेशन न देता अधिक पैसे घेऊन रेशन दिले जाते.
काही कार्ड धारकांना रेशनच दिले जात नाही.

असे आरोप श्री.माधव लक्ष्मण मेकाले यांनी या वेळी केले आहेत.
व त्यासोबत च येत्या 15 जुलै पर्यन्त जर अडचणी दूर झाल्या नाहीत तर मा.जिल्ह्याधिकारी कार्यालयापुढे आत्मदहन करेन असा ईशारा निवेदनातुन या वेळी माधव मेकाले यांच्याकडून देण्यात आला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here