देशातली पहिली किसान रेल्वे आजपासून धावणार.

0
88

टीम सिंहगड मित्र.
भाजीपाला, फळे यासारख्या नाशिवंत मालाच्या जलदगतीने वाहतुकीसाठी रेल्वेची ‘किसान रेल’ ही विशेष सेवा आजपासून सुरू होत आहे.

पहिली रेल्वे गाडी नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथून 11 वाजता बिहारमधील दानापूरकडे रवाना होईल.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर व रेल्वेमंत्री पियुष गोयल दिल्लीतील ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील  या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन रेल्वेमार्गाने नेले जाईल. ही गाडी वेगवेगळ्या स्थानकांवर माल उचलण्यासाठी आणि उतरवण्यासाठी थांबेल.

7 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या दरम्यान प्रत्येक शुक्रवारी देवळाली ते दानापूर आणि रविवारी दानापूर ते देवळाली या विशेष गाड्या धावतील.

ही विशेष शेतकरी गाडी नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन आणि बक्सर स्थानकांवर थांबेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here