गणपतराव देशमुखांच्या 94व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

0
131

ज्ञानेश्वरी आयवळे. ( सिंहगड मित्र प्रतिनिधी )

आयुष्यातील ७० वर्षे राजकरणात तर सलग ११ वेळा आमदार म्हणून विश्व-विक्रम व २ वेळा मंत्री झालेले सांगोला तालुक्याचे आदरणीय गणपतराव ( आबासाहेब ) देशमुख यांचा आज 94 वा वाढदिवस …!

आबासाहेबांचा 94व्या वाढदिवसानिमित्त सांगोला तालुक्यातील मौजे. कमलापूर येथील मारुती मंदिरामध्ये आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शेतकरी कामगार पक्ष , शिवशंभो प्रतिष्ठान व समस्त कामालापूर ग्रामस्थांनी मिळून या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .
यावेळी गावातील व आजूबाजूचा गावांमधील लोकांनी ही रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसून आले .
आयोजकांकडून प्रत्येक रक्तदात्यास एक हेल्मेट त्यासोबत पाण्याचा जार भेट म्हणून देण्यात आला .

यावेळी बाबुराव  बंडगर,सतीश तंडे ,रावसाहेब अनुसे, सोमनाथ अनुसे,रमेश वाघमारे,प्रा.हणमंतराव कोळवले,प्रा.बाळासाहेब कोकरे, प्रमोद ऐवळे, व्यंकटेश ऐवळे, अमित भडंगे,आनंदा ऐवळे,सुनिल तंडे, देवीदास ढोले,राहुल ऐवळे, विनायक खटके ग्रामस्थ उपस्थित होते .
व यावेळी शिवशंभो प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यकर्त्यांनी समन्वय साधत शिबिर यशस्वी पार पाडले .

‘सध्या कोरोना महामारी चे रुग्ण गावपातळीवर देखील मिळत आहेत . कोणत्याही रुग्णाला रक्ताची गरज भासू शकते त्या दृष्टीने उपाययोजना म्हणून व आबासाहेबांचा वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही आज हा उपक्रम केला आहे’ , असे शिवशंभो प्रतिष्टानचे कार्यकर्ते व्यकंटेश ऐवळे संवाद साधताना म्हणाले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here