10 दिवसापासून बिबटयाचा ऐसकाँरनर मध्ये धुमाकूळ.

0
331

उल्हास तोत्रे ( आंबेगाव प्रतिनिधी )

मंचर (पुणे) : ऐसकाँरनर (ता. आंबेगाव) गेल्या 10 दिवसापासून बिबट्याने या भागात धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वनखात्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.

10 दिवसापासून वैभव ज्ञानेश्वर गांजाळे यांचं कुत्र नेले व किशोर लक्ष्मण गांजाळे याच्या गोठ्या पाशी आढळून आला व दूरदैवाने त्याच्या गोठ्यात गाय, वासरे होती त्यावर होणारा हल्ला बचावला आहे अमोल बाळासाहेब पवळे यांच्या ही वासरावरती हल्ला झाला.
खूप पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले केले आहेत.

श्रीराम वामन गांजाळे, तुळशीराम देवराम लोंढे ,अमोल बाळासाहेब पवळे यांनी शेतामध्ये रात्रीचे शेतामध्ये काम करण्यासाठी जावे लागत आहे तरी लवकर वनखात्याने बिबट्याला जेरबंद करावे अशी विनंती केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here