टीम सिंहगड मित्र.
आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या कार्यकारणी वर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी नवीन पदनियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आज जगदीश मुळीक भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष यांनी घोषित केली.
यावेळी प्रभाग क्रमांक ३२ वारजे माळवाडी चे माजी नगरसेवक श्री किरण बारटक्के यांची पुणे शहर भाजपच्या चिटणीस पदी निवड निवड झाली आहे.
श्री किरण भाऊ बारटक्के हे प्रभाग क्रमांक बत्तीस वारजे माळवाडी मध्ये त्यांनी त्यांनी पाच वर्षे नगरसेवक म्हणून काम केले आहे त्यासोबतच त्यांनी याआधी भाजप पक्षाचे पुण्यातून शहर उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे .
तरी श्री किरण बारटक्के व सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सिंहगड मित्र न्यूज तर्फे हार्दिक अभिनंदन .