खडकवासला धरण ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने मुठा नदीपात्रात विसर्ग.

0
415

टीम सिंहगड मित्र.

पुण्याचे खडकवासला धरण ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने मुठा नदीपात्रात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हा विसर्ग ४२८ क्युसेक इतका आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

हा विसर्ग जास्त प्रमाणात नसला तरी आपत्ती व्यवस्थापनाने आपली यंत्रणा सतर्क असल्याचे सांगितले आहे. खडकवासला धरण भरल्याने पुण्याचे पाण्याचे संकट टळले आहे.

धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्याने धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी प्रमाणेच यंदाही पाऊस झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यातही पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने शेतीसाठी याचा उपयोग होणार आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्यही चांगला पाऊस होत असल्याने त्यांच्या पाणी पातळीतही वाढ होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here