तेजस्विनी लोणकर ( नाशिक प्रतिनिधी )
नाशिक शहरामध्ये कोरोना रुग्णांची वाढ बघता नाशिक महानगरपालिका ,भारतीय जैन संघटना, ऑल डॉक्टर्स असोसिएशन तसेच राष्ट्रवादी डॉक्टर सेल तर्फे ज्यांना करोना आजराचे लक्षणं आहेत किंवा जे करोना पेशंट च्या संपर्कात आले आहे अशा रुग्णांसाठी मोफत रॅपिड टेस्ट चे आयोजन दि.10 आणि 11 ऑगस्ट रोजी सम्राट ट्रोपिकाना, सेरीन मेडोज गंगापूर रोड येथे करण्यात आले.
तसेच ह्या कार्यक्रमात परिसरातील 650 नागरिकांनी स्क्रिनिंग केली त्यामधून 200 नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी डॉक्टर सेल चे शहराध्यक्ष डॉ अमोल वाजे यांनी केले होते.
तपासणी शिबिर यशस्वी होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे ,डॉ उल्हास कुटे ,डॉ सहाणे ,डॉ मोहित पटेल ,नाशिक महानगरपालिका ,भारतीय जैन संघटना ,सम्राट ट्रोपिकाना वर्किंग कमिटी तसेच राष्ट्रवादी डॉक्टर सेल यांनी सहकार्य केले.
तसेच त्यांनी लोकांना अश्या परिस्थितीत सकारात्मकता दाखवून स्वतःची व आजू बाजूच्या लोकांची काळजी घ्यावी असे आव्हान केले. ह्या परिस्थितीत घाबरून नाही तर सोबत राहून कोरोना ला लढा देऊ अशी आशा डॉक्टर्स नी व्यक्त केली आणि लोकांचे प्रोत्साहन वाढवले.