पिंपरी चिंचवड मध्ये ‘डफली बजाव’ आंदोलन.

0
201

ज्ञानेश्वरी आयवळे ( पुणे प्रतिनिधी )

आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी ( दि.१०ऑगस्ट ) केलेल्या आदेशप्रमाणे आज राज्यभर मोठ्या प्रमाणात ‘डफली बजाव ‘ आंदोलने सुरू झाली आहेत.
वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सुद्धा आज पिंपरी चिंचवड वल्लभनगर एसटी बस डेपो येथे ‘डफली बजाव’ आंदोलन करण्यात आले .

सतत असणाऱ्या लॉकडाऊन मुळे व्यापारी वर्ग व सर्वसामान्य जनतेची आर्थिक बाजू ढासळलेली आहे .
सरकार या बाबतीत गांभीर्याने विचार करत नसून वंचित बहुजन आघाडीने सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करत हे आंदोलन सुरू केले आहे . गरीब , शोषित , वंचित जनतेला लॉकडाऊन चा माध्यमातून छळणाऱ्या सरकारला जाब विचारण्याकरिता आंदोलनाची सुरुवात झाली आहे .

लॉकडाऊनच्या विरोधात राज्य सरचिटणीस मा अनिल जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वात व शहर अध्यक्ष देवेंद्र तायडे व युवक आघाडी अध्यक्ष गुलाब पानपाटील यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here