सुप्रीम कोर्टचा ऐतिहासिक निर्णय….!

0
218

टीम सिंहगड मित्र.

आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलांप्रमाणे मुलीनांही समान वाटा मिळावा या मुद्द्यांवरून गेल्या कित्येक वर्षांपासून वाद सुरू होता. अखेर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आपला ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

यापुढे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान वाटा असणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. आपल्या पित्याच्या मालमत्तेत हिंदू स्त्रियांना भावाप्रमाणे समान वाटा मिळेल, असे 2005 मध्ये अधिनियमित केले गेले होते.

मुलगा व मुलगी दोघांनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क मिळतील. मात्र हा कायदा 2005 पूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यास याचा लाभ मिळेल की नाही हे स्पष्ट नव्हते.

ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला . न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा कायदा प्रत्येक परिस्थितीत लागू होईल असा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

संपत्तीचे वाटप होत असताना वडील असतील किंवा निधन झाले असेल तरीही मुलीला मुलाप्रमाणेच समान वाटा मिळणार असल्याचे आज कोर्टाने स्पष्ट केले.

जस्टिस मिश्रा म्हणाले ,’प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मुलीला समान वाटा हा मिळालाच पाहिजे.

मुलीला 1956 च्या कायद्यानुसार हिस्सा मिळणार होता. मात्र 2005 मध्ये केंद्र सरकारने यात बदल केला. त्यात 2005 नंतर ज्या मुली जन्मतील त्या मुलींना समान हिस्सा मिळणार असा बदल केला.

आता हा मुद्दा कायमचा वगळला आहे. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीत आता मुली हक्काने आपला वाटा मागू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here