या पाण्याचा प्रवाह कोणता ?

0
352

मारुती निधान ( धायरी / नर्‍हे प्रतिनिधी )

पुण्यात सलग दोन दिवसांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. धायरी मध्ये ही सतत पाऊस कोसळत आहे. लॉकडाऊन नंतर आता कुठे लोक बाहेर पडायला लागल्या नंतर पावसाने लोकांना घराबाहेर पडण्यासाठी प्रश्न निर्माण केला आहे .

धायरी मधील उंबर्‍या गणपती चौकातील डी.एस.के. रस्त्याची झालेली आवस्था, रस्त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे . रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर पावसाचे पाणी रस्त्यावर तलावासारखे साचले आहे .

मात्र कुठं खड्डा आहे ? याचा अंदाज घेण्यासाठी गाडी चालकाला चांगलीच कसरत करावी लागते.

या गोष्टीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. पावसाचा आधी पावसाळी कामे शासनाने पार पाडली असती तर कदाचित ही वेळ आली नसती.

एका बंदिस्त गटाराच्या माध्यमातून यावर उपाय योजना करता येते का ? याचाही विचार करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here