मातृ देवो भव ! पितृ देवो भव! असे सांगणारी आपली अतिप्राचीन संस्कृती प्रत्येक भारतीयांना अभिमानास्पद आहे. परंतु असे असेल तरी वास्तवामध्ये, वृद्ध व्यक्तींची निरुपयोगी ता अधिकाधिक स्पष्ट झाली की घरातील नवीन पिढीला ती एक अडगळ वाटू लागते. उमेदीच्या काळात ज्यांनी घरटे बांधलेले असते, त्यांना घरट्यातून त्यांना बाहेर पडावे लागते. अशा ज्येष्ठ नागरिकांना मायेची ऊब देणारी श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम, कात्रज इयत्ता वाखाणण्याजोगी संस्था आहे…..

सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण आणि तनामनापासुन देखभाल करणारी माणसे; असा सुंदर मिलाफ या मायेच्या घरट्यामध्ये बघायला मिळतो. मनुष्याचा वृद्धापकाळ हा शिशुअवस्थेसारखा असतो. हे तत्व या संस्थेमध्ये छान रुजले आहे. आणि त्या याच अनुषंगाने या ठिकाणी वृद्धांची काळजी घेतली जाते.

या संस्थेमध्ये वेळच्यावेळी चहा, नाष्टा, जेवण दिले जाते. त्याचबरोबर मनोरंजन, सुखकर खेळ, योगा, ध्यान इत्यादी बाबी देखील या ठिकाणी नित्य नियमाने केल्या जातात. शारीरिक त्याचबरोबर मानसिक आरोग्य निकोप कसे राहील, यासाठी येथे विशेष प्रयत्न केले जातात…. वेळच्या वेळी डॉक्टरांच्या तपासण्या त्याचबरोबरीने मानसोपचार तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित केले जाते. त्यामुळेच या ठिकाणी प्रत्येक जण स्वस्त आणि सकारात्मक मानसिकतेने चे उत्तम आयुष्य जगत असतो.

तुम्ही या ठिकाणी आवर्जून सदिच्छा भेट द्या!!!  येथील स्वच्छता, नीटनेटकेपणा, गप्पांच्या मैफली, घरच्या जिव्हाळ्याने काम करणारे व्रतस्थ हात, इत्यादी गोष्टींनी मन भरून येते. आणि हे परोपकारी सुंदर व्रत या संस्थेने अगदी अल्प फी मध्ये स्वीकारले आहे!!

आश्रमातील दैनंदिन दिनक्रम.. सकाळी लवकर ६:०० वाजता उठणे. सकाळी ६:३० वा योग, ध्यान धारणा. सकाळी ७:०० वा चहा ,बिस्किट. सकाळी ७:३० वा अंघोळ ,प्रार्थना. सकाळी ८:३० वा नाष्टा. सकाळी १०:०० वा दूध बिस्किट. दुपारी १२:३० वा जेवण. दुपारी १:३० ते २:०० गप्पा. दुपारी २:०० ते ३:३० आराम. दुपारी ३:३० ते ४:१५, कॅरम .सायं ४:१५ ते ५:०० टीव्ही. सायं ५:०० ते ६:०० सूप , फ्रुट. सायं ६:०० ते ७:०० भजन, सायं ७:०० ते ८:०० जेवण झाल्यानंतर. सायं ८:००ते ८:३० चालणे. रात्री ८:३० ते ९:३० टीव्ही पाहणे व झोपणे…

नाती जपणारे सुरक्षित घर -श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम!!… माझे कुटुंब, माझे आजोबा….
श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम पुणे कात्रज!!

Contact : 7020603945 / 9023974911

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here