Home About us

About us

सिंहगड मित्र हे पाक्षिक वृत्तपत्र असून दर महिन्याच्या दहा व सव्वीस तारखेला प्रकाशित होते. 20 जुलै 2012 पासून हे वृत्तपत्र सुरू आहे. सिंहगड रोड, पुणे परिसरातील भागांमध्ये हे वृत्तपत्र घरोघरी विनामूल्य वितरित केले जाते. वैविध्यपूर्ण लेख, विविध विषयांची सखोल माहिती, व्यवसायिक लेख व व्यवसायांची माहिती, जाहिराती असे या वृत्तपत्राचे स्वरूप आहे.
सिंहगड मित्र या वृत्तपत्रांमुळे परिसरातील नागरिकांना विविध व्यवसाय अथवा आवश्यक असणार्‍या दैनंदिन गरजांची माहिती मिळत असते. त्यामुळे सिंहगड मित्र हे पाक्षिक लोकप्रिय झाले आहे.
सध्याच्या डिजीटल युगामध्ये सिंहगड मित्रने आपल्या वेब पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील व्यवसायांची माहिती लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ठरवले आहे. त्याकरीता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्राम ट्विटर यांच्या सहाय्याने व्यवसायिकांची माहिती लाखो वाचकांपर्यंत पोहोचवली जाते याचा निश्चितच व्यावसायिकांना प्रचंड फायदा होत आहे.
सिंहगड मित्र मीडिया हाऊस या कार्यालयामध्ये मार्केटिंग, जाहिरात व्यवस्थापन, जाहिरात डिझाईनिंग, वेब डिझाईनिंग, टेली कॉलिंग, व्यवसाय वाढीसाठी संकल्पना डिझायनिंग असे वेगवेगळे विभाग आहेत. या विभागांच्या माध्यमातून जवळपास 12 ते 15 कर्मचारी काम पाहतात.
सिंहगड मित्र मिडीया हाऊसचे संचालक श्री. शरद श्रीपती पवार हे आहेत. ग्राफिक्स डिझायनिंग, जाहिरात व्यवस्थापन व पत्रकारितेचा त्यांना प्रचंड अनुभव आहे. ऑल इंडिया मिडीया असोशिएशनचे चे सदस्य आहे. डिजीटल मिडीया संघटना व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे देखील पदाधिकारी आहेत.